‘ही’ सोपी ट्रिक वापरा, वाटेल शांत-वाढेल आत्मविश्वास….

शरीराची जागरुकता आणि एकाग्रता वाढविण्यास मदत करतात. कोणत्याही गोष्टीपेक्षा, योग तुम्हाला एका गोष्टीकडे परत आणतो जो तुमचा श्वास जिवंत ठेवण्यास मदत करतो. ही योगासने कोणती आणि ती कशी करायची ते पाहुयात.

बालासन गुडघ्यांवर बसायचे, दोन्ही गुडघे थोडे बाजूला घेऊन शरीर मागच्या बाजूला ताणायचे.  यावेळी दोन्ही हात जमिनीवर पुढे ठेवायचे आणि ताणायचे. यामध्ये संपूर्ण शरीराला ताण पडतो आणि अतिशय रीलॅक्स वाटते.

साईड ट्वीस्ट मांडी घालून बसायचे कंबरेतून एका बाजूला वळायचे. त्यानंतर डोक्यावर नमस्कार करायचा आणि दुसऱ्या बाजुला वळायचे. प्रत्येक बाजूला किमान १० वेळा अशाप्रकारे ताण द्यायचा. यामुळे कंबरेचे किंवा पाठीचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. . बटरफ्लाय पोजदोन्ही पायांचे  तळवे एकमेकांना चिकटवायचे आणि गुडघे फुलपाखरासारखे वर खाली हलवायचे. सुरुवातीला १५ सेकंद आणि नंतर किमान २ मिनीटांपर्यंत हा व्यायाम करायचा. यामुळेही रीलॅक्स वाटण्यास मदत होते.

पवनमुक्तासन पाठीवर झोपायचे, दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून पोटावर दाबायचे. यामुळे पोटात साचलेला गॅस बाहेर पडण्यास मदत होते. रिलॅक्स वाटण्यासाठी हे अतिशय आवश्यक असते.

🤙 8080365706