
कोल्हापूर : नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘उद्योजकता पुरस्कार’ खुपीरे येथील लालू उर्फ नितीन भोसले याना हातकणंगले विधानसभा सदस्य राजुबाबा आवळे यांच्या हस्ते देण्यात आला.

वाठार येथील चिंतामणी हॉल येथे हा सोहळा पार पडला.नितीन भोसले यांच्या शेतीमधील विविध व्यावसायिक प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पल्लवी कोरगावकर होते.
उद्योजक्ता, कर्ज पूर्तता आणि औद्योगिक कौशल्य या विषयावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम सहाय्यक गणेश भोसले, अमित हुजरे, दत्ता रावण उपस्तिथ होते.
