कर्णबधिर विद्यार्थ्यांचा पहिला जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा

प्रदर्शनातील उपकरणाची माहिती घेताना सौ नवोदिता घाटगे

कागल : येथील श्री शाहू छत्रपती अपंग कल्याण संस्थेमार्फत कर्णबधिर शाळांमधील विद्यार्थ्यांचा पहिला जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा कागलच्या राजे दिलीपसिंह घाटगे कर्णबधिर विद्यालयात झाला. पहिला जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा आयोजित करण्याचा मान श्री शाहू छत्रपती अपंग कल्याण संस्था, कागल या संस्थेस मिळाला.राजमाता जिजाऊ समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले. सुरुवातीला डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन केले.

यावेळी कर्णबधिर मुलांनी तयार केलेले अत्यंत सुंदर व सुबक असे विज्ञान प्रकल्प पाहून सर्व मुलाचे व विशेष शिक्षकांचे कौतूक केले. सामान्य मुलांच्या बरोबरीने दिव्यांग मुलांनी आपले कलाकौशल्य दाखवुन दिले आहे. अशा प्रकारचे विज्ञान मेळावे दरवर्षी आयोजित करून या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शिक्षणाची संधी निर्माण करून देण्यात यावी .यासाठी लागणारे सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल’ असे उद्गार त्यांनी अध्यक्षीय भाषणात काढले. विज्ञान मेळाव्यात जिल्ह्यातील एकुण ७ शाळा सहभागी झाल्या होत्या. इ. १ ली ते ४ थी व इ. ५ वी ते ७ वी असे २ गट करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी परिक्षकांना आपल्या प्रकल्पाची माहिती सांकेतिक भाषा व तक्त्याच्या आधारे सांगितली. बक्षीस वितरण नवोदिता घाटगे, प्रकाश पाटील, कर्नल शिवाजी बाबर, प्रशांत मुजुमदार याच्या शुभहस्ते करण्यात आले. सौ. उमा दिपक नाडगौडा यांच्या सौजन्याने हा मेळावा घेण्यात आला. स्वागत मुख्याध्यापक संतोष गायकवाड यांनी केले. चंद्रकांत शेटे, सदानंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन प्रशांत वाळवेकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सुहास कुरुकले यानी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आभार मानले.

🤙 8080365706