
कोल्हापूर : शांतिनिकेतन शाळेमध्ये इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अनुप्रिया अमितकुमार गावडे या विद्यार्थिनीने रामानुजन मॅथेमॅटिक्स चॅलेंज 2022 या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक मिळवत रौप्य पदकाला गवसणी घातली.

देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या व्यतिरिक्त अनुप्रियाने यावर्षीच्या ओलंपियाड मध्येही अनेक सुवर्णपदक मिळविले आहेअनुप्रियाने ओलंपियाडमध्ये अनेक जागतिक क्रमांक देखील मिळवले असून सामान्य ज्ञान, सामाजिक विज्ञान, गणित, इंग्रजी, कम्प्युटर, विज्ञान,आयक्यू,एन एस टी एस सी या परीक्षेमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. याशिवाय क्रीडा क्षेत्रातही तिने उत्तुंग कामगिरी केली आहे. आज पर्यंत अनेक स्पर्धात्मक परीक्षेमधून तिने 50 हून अधिक सुवर्णपदक मिळविले आहे.
भारतीय घटना व बालहक्क कायदा पठण करून विश्वविक्रम करणाऱ्या अनुप्रिया गावडे ही सर्वात लहान वयातील डॉक्टरेट, प्रोफेसरशिप आणि बीजभाषक होणारी जगातील पहिली कन्या असून ती अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेची ब्रँड अँबेसिडर देखील आहे.तिने आजवर 25 हून अधिक सार्वजनिक भाषणे दिली असून तिच्या कामगिरीची दखल घेत तिला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय व प्रादेशिक स्तरावर 40 हून अधिक पारितोषिके प्राप्त झाले आहेत. सध्या तिने संविधान व बाल हक्क कायद्यासंदर्भात जाणीव जागृतीचे काम हाती घेतले असून ती अनेक शाळा महाविद्यालया मधून हा उपक्रम राबवित आहे. ती नाईट कॉलेजची प्रा. डॉ. अक्षता गावडे व सीए अमित कुमार गावडे यांची कन्या असून तिला संस्थेच्या संचालिका सौ राजश्री काकडे मॅडम, प्राचार्यासौ जयश्री जाधव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
