मराठी भाषा दिनानिमित्त प्राचार्य शानेदिवान यांचा सत्कार

कोल्हापूर: मराठी भाषेची जोपासणा करायची झाल्यास ती विद्यार्थ्यांच्या पातळीवर होणं गरजेंचं आहे असं मत शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आर. के. शानेदिवान यांनी व्यक्त केले.

शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीनं मराठी भाषा दिनानिमित्त सत्कारा प्रसंगी ते बोलत होते. कवी कुसूमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याचं औचित्य साधून कोल्हापुरातील शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीनं शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॉ. आर. के. शानेदिवान यांचा शाश्वत प्रतिष्ठाच्या वतीने रेशन व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्राचार्य शानेदिवान यांची घराची बोली भाषा हिंदी असूनही त्यांनी मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. शहाजी महाविद्याचत प्राचार्य पदाची धूरा संभाळत मराठी भाषेचा गोडवा वाढावा यासाठी महाविद्यालयात गेली अनेक वर्षे विविध उपक्रम ते राबवत असल्याचं मोरे यांनी सांगितलं. मराठी भाषा ही मुळातचं समृध्द अशी भाषा आहे. इतर भाषेच्या तुलनेत मराठी भाषेला अधिक गोडवा आहे.

मराठी भाषा संवर्धनासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असल्याचं सांगून प्राचार्य शानेदिवान म्हणाले, मराठी भाषेची जोपासणा करायची झाल्या ती विद्यार्थ्यांच्या पातळीवर होणं गरजेंचं असल्याचं त्यांनी सांगितलं. या सत्कार प्रसंगी शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. गुरुदत्त म्हाडगुत,संचालक निखिल जाधव, प्रा. एम, एन. कांबळे, प्रा. दीपक वळवी यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

🤙 8080365706