उचगांव सर्व्हिस रोडसह हायवे ब्रिज खाली पडलेल्या मोठ- मोठ्या खड्डयांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी

कोल्हापूर : उचगांव हायवे पुलाखालुन हुपरी सह कर्नाटकात मोठ्या प्रमाणात वाहतुक होते असते. विध्यार्थी वाहतूक व स्थानिक वाहनधारकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते तसेच उचगांव हायवे पुलाखाली मोठ मोठे खड्डे पडले असून येथे रस्ता अत्यंत खराब झाला आहे. पुलाखाली तर येणारे सर्वच सर्व्हिस रोड खड्डेमय बनले आहेत.

हायवे पुलाखालील दिवसातुन ४ ते ५ वेळा वाहतुकीची कोंडी होते खड्ड्यांमुळे वाहनांना एकदम हळुवार वाटचाल करावी लागते त्यामुळे वाहनांचा वेग कमी झाला की, एखादे मोठे कंटेनर सारखे वाहन आले की, त्या खड्ड्यातुन वाटचाल करत असताना पुलाखाली वाहतुकीची कोंडी होते. तसेच सर्व्हिस रोडवरून नॅशनल हायवे वरती जाणाऱ्या रोडला ही मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बरेच अपघात घडले आहेत. सर्व्हिस रोड ते हायवे वरती जाणारा रस्ता हा मृत्युचा सापळा बनला आहे. हावेवरती वाहणांचा वेग प्रचंड असतो त्यामुळे खड्डेमय सर्व्हिस रोड हायवे या दोन्ही गोंधळात अनेक मोटरसायकल स्वारांनी आपले जिव गमावले आहेत. या अपघातात उंचगाव मॅकडॉनल्ड्स सरनोबतवाडी तसेच हॉटेल सूर्यदिपच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्विस रोड नसल्याने वाहनधारक उलट्या मार्गाने आपला जीव मुठीत धरून प्रवास करत असतात. मॅकडॉनल्ड्स येथे हायवे वरती वेग मर्यादाचा फलक लावून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे रमलर मारावेत जेणेकरून हायवेवरील वाहनांचा वेग त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. तसेच हायवेला लागुन असणाऱ्या गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात घान असून ती तात्काळ स्वच्छ करण्याच्या सुचनासह हायवेचा सर्व्हिस रोडसह पुलाखालील खड्डे मुजवण्याचे काम तातडीने करावे. अन्यथा उध्दव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने अधिकाऱ्यांना याचा जाब विचारून सदर भागामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी. या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या ( ठाकरे गट) वतीने मा. मॅनेजरसो, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या नावे सहाय्यक अभियंता मा.चंद्रकांत भरडे यांना देण्यात आले.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, उंचगाव गावप्रमुख दिपक रेडेकर, उपतालुकाप्रमुख राहुल गिरूले, युवासेना तालुकाप्रमुख संतोष चौगुले, फेरीवाला संघटनेचे उपतालुकप्रमुख बाळासाहेब नलवडे, दत्तात्रय विभूते, प्रफुल्ल घोरपडे आदी उपस्थित होते.

🤙 8080365706