आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई : सत्ता बदलानंतर शिंदे-फडणीवस सरकारचे पहिले महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.

९ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे अभिभाषण करणार आहेत. दरम्यान, विरोधकांनी सत्ताधारी गटाला घेरण्याची तयारी केल्याने हे अधिवेशन वादळी ठरणार आहे.सत्ता संघर्षावरून विरोधात आणि सत्ताधारी यांच्यात वाद पेटला आहे. दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल केल्याने हा संघर्ष आता आणखीन तीव्र झाला आहे. दरम्यान, एकमेकांवर सुरू आरोप-प्रत्यारोपामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

🤙 8080365706