‘मुंबई पालिकेला आम्ही सपोर्ट करू पण काही गडबड’… देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

मुंबई : मुंबई पालिकेकडून काही चांगलं काम होत आहे, त्याला आम्ही सपोर्ट करू. पण काही गडबड झाली तर आम्ही सोडणार नाही. तुम्हाला काम झाल्यावरच आम्ही सांगू की,हे आमच्यामुळे काम झालं आहे’ असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सुशोभीकरण अंतर्गत ३२० विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडत आहे. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. आज आनंदाची गोष्ट आहे. मुंबईच्या कायापालट करण्याचा तिसऱ्या टप्प्याचं आज भूमिपूजन होत आहे.आत्तापर्यंत 320 काम झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इक्बाल सिंग चहल यांना मुंबईचा कायापालट करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेचा जनतेचा पैसा बँकेत ठेवण्यापेक्षा तो जनतेसाठी खर्च करून सुखकर कसं जगता येईल त्यावर भर द्यावा, असं म्हणत फडणवीसांना ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला.