
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. यश व फायदा मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. जुन्या परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत कला गुणासाठी चांगले वातावरण राहील.
वृषभ नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. राहु-हर्षल-चंद्र युतीत अनपेक्षित आर्थिक लाभही संभवतो. मात्र, अति आत्मविश्वास आणि अति उत्साहीपणा टाळावा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला.
मिथुन शासकीय सेवेत नियमबाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस ठरेल. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्भवतील . कुटुंबापासून विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका.
कर्क कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. प्रगतिकारक दिवस आहे. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
सिंह नोकरी व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण होतील. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील.
कन्या आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विरोधक डोके वर काढतील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थाबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका.
तूळ व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. दुसर्याला जामीन राहू नका, अन्यथा फसवणूक आर्थिकहानी होण्याची शक्यता आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे.
वृश्चिक नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी, समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. व्यसनी मित्रांपासून दूर राहा.
धनु आज संयमी भूमिका घेतली तर मोठे आर्थिक लाभ होतील. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. अनावश्यक चिंतेपासून दूर राहा. देण्या-घेण्यात सावधानी बाळगा. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. व्यापार-व्यवसायात दिवस फायदेशीर राहील.
मकर घरासंबंधी समस्या दूर होतील. आपल्या हातून विशेष काम होण्याचे योग आहेत. व्यापारात साथिदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. शारिरिक कामात वाढ करण्यासाठी प्रयत्न करा. काही विशेष कामानिमित्त आपणास लांबच्या प्रवासाचे बेत आखावे लागतील.
कुंभ व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस ठरेल. लेखकवर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मानसन्मान मिळेल. कर्तुत्व सिद्ध करू शकाल. विधायक कार्य घडेल.
मीन मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील.
