
कोल्हापूर : अवघ्या मानव जातीच्या अस्तित्वात प्रश्नचिन्ह निर्माण झालेले पंचमहाभोवतावरील अतिरेकी आक्रमण हे अत्यंत चिंतेचा विषय असून यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेचे आहे .त्यासाठी विविध विघापीठ – शिक्षण संस्थांमधून पंचमहाभूत सजगता संदर्भाने पदवी – पदविका अभ्यासक्रम सुरू व्हावेत अशी अपेक्षा भाजपा खासदार आणि आयसीसीआर प्रमुख सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केली .
सिद्धगिरी मठ येथे आज पाचव्या दिवशी पृथ्वी तत्त्वावर झालेल्या परिसंवादात त्यांनी आपला सहभाग नोंदवला तसेच या सर्व परिसराची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमाची संवाद साधला .
कोल्हापुरातील पंचमहाभूत लोकोत्सवाच्या उपक्रमाचे जिल्हा तालुका सर्वत्र अनुकरण व्हावे .या पाच दिवसांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विचारवंत प्रयोगशील कार्यकर्ते – संतगण यांचे व्यापक प्रमाणात विचारमंथन झाले आहे त्या सर्वांचे एकत्रिकरण करून आणि इतर साहित्य संकलन करून भविष्यात विविध शिक्षण संस्थांनी ‘ पंचमहाभूत सजगता ‘या संदर्भाने अभ्यासक्रम सुरू करावेत , ती काळाची गरज आहे असे मत त्यांनी या संदर्भाने व्यक्त केले .
भारतीय परंपरेमध्ये आणि भारतीय विचारधारा ही मुळापासूनच निसर्गाची समरस होणारी आणि निसर्गाची एकरूप होऊन कार्यरत करणारी अशीच आहे . ‘ पंच परमेश्वर – पंच कन्या पूजन – सह पंचमहाभूत स्मरण हे त्यांचेच प्रतिक आहे . कल्चर आणि अँग्रीकल्चर हे एकत्रित असावेत यासाठी ग्लोबल ते लोकल पातळीवर आय सी सी आर कार्यरत आहे .
हा विचार आगामी काळात व्यापक प्रमाणात सर्वत्र जाण्यासाठी एक वेगळी पाऊलवाट सिद्धगिरी कणेरी मठातून सुरू झाली आहे , भविष्यात त्यांचा महामार्ग बनेल ,यासाठी विविध संस्था स्तरावर आपले सहकार्य राहील अशी अभिवचन ही विनय सहस्त्रबुद्धे यांनी संदर्भाने बोलताना शेवटी दिले . सिद्धगिरी मठाचे विश्वस्त उदय सामंत यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
