डॉ. संजय पोवार यांची काँग्रेसच्या ग्राहक संरक्षण सेल च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निव

कोल्हापूर: कोल्हापूर येथील कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे कार्यालयीन सचिव डॉ. संजय पोवार – वाईकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ग्राहक संरक्षण सेल च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच त्यांच्या कडे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सुद्धा कार्यभार देण्यात आला.

संजय पोवार – वाईकर यांनी कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण सेलचे अध्यक्ष म्हणून केलेली उत्तम कामगिरी पाहता त्यांची निवड महाराष्ट्र प्रदेश च्या उपाध्यक्ष पदी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार व कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या शिफारशी वरून महाराष्ट्र प्रदेश ग्राहक संरक्षण सेलचे अध्यक्ष नितिनभाऊ पाटील यांनी केली. सदर निवडीचे पत्र मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते व नितीनभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

🤙 8080365706