होळीसाठी आता नैसर्गिक गोष्टी वापरुन आता घरीच बनवा रंग…

होळीच्या मौजमजेमध्ये आपण आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घेणं आवश्यक. आपण ऑरगॅनिक गुलालचा वापर करून होळी साजरी करू शकता. आपण हे गुलाल कमी साहित्यात, काही मिनिटात घरी बनवू शकता. चला तर मग गुलाल तयार करून, लोकांवर रंगाची उधळून करूया..

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात बीटरूटचे काप घाला. त्यात किंचित पाणी मिसळून,  बीटरूटची पेस्ट तयार करा. एका बाऊलमध्ये कोर्न फ्लोर अथवा टॅल्कम पावडर घ्या. त्यात १ टेबलस्पून गुलाब जल मिक्स करा. त्यानंतर तयार बीटरूटची पेस्ट मिक्स करा. अशा प्रकारे गुलाबी रंग रेडी.

मिक्सरच्या भांड्यात पालक आणि कोथिंबीर घ्या. त्यात थोडे पाणी मिसळून मिश्रण वाटून घ्या. एका बाऊलमध्ये कोर्न फ्लोर अथवा टॅल्कम पावडर घ्या. त्यात एक टेबलस्पून गुलाब जल मिक्स करा. त्यानंतर तयार पालक – कोथिंबीरची पेस्ट मिसळा. अशा प्रकारे हिरवा रंग रेडी.

होळीच्या दिवशी लाल रंग अधिक वापरला जातो. यासाठी ३ चमचे कुमकुम, १ चमचा चंदन पावडर आणि ५ चमचे मैदा घ्या. या तिन्हींचे मिश्रण करून लाल रंग तयार करता येईल. बाजारातून विकत घेतलेली कुमकुम शुद्ध असावी हे लक्षात ठेवा.

पिवळ्या रंगासाठी एका बाऊलमध्ये ३ चमचे हळद,  २ चमचे तांदळाचे पीठ आणि १ चमचा चंदन पावडर घ्या. हे तिन्ही मिश्रण मिक्स करा. तुमचा ऑरगॅनिक पिवळा रंग तयार होईल. अशा प्रकारे नैसर्गिक वस्तूंचा वापर करून आपण इतर रंगही सहज घरी बनवू शकता

🤙 8080365706