आज उद्योगपती एलन मस्कहून अधिक श्रीमंत असतो ; रामदेव बाबा

मुंबई : योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ या कंपनीने बाजारात आपले वेगळे अस्तित्व बनवले आहे. काही महिन्यांपूर्वी पतंजलीचा आयपीओही बाजारात आला. त्यामुळे बाबा रामदेव योगगुरू नसून उद्योजक असल्याची टीका त्यांच्यावर होत राहते. याला आता बाबा रामदेव यांनी उत्तर दिले असून देशाऐवजी फक्त व्यवसायाचा विचार केला असता तर मी आज उद्योगपती एलन मस्कहून अधिक श्रीमंत असतो असे ते म्हणाले. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.

मी एकदा म्हटले होते की, टाटा, बिर्ला, अदानी, झुकरबर्ग, एलन मस्क, वॉरेन बफे आणि बिल गेट्स यांच्यापेक्षा बाबा रामदेव यांची वेळ महत्वाची आहे. ते सर्व स्वतःसाठी जगतात, पण संन्यासी सर्वांसाठी जगतो. म्हणूनच माझा वेळ, शक्ती आणि ज्ञान सर्वांच्या कल्याणासाठी आहे. वेद, पुराण, रामायण, महाभारत, भगवद्गीता आणि पूर्वजांकडून मला मिळालेले ज्ञान मी संशोधन करून सर्वांसमोर ठेवले, असेही बाबा रामदेव यावेळी म्हणाले.

🤙 8080365706