‘चिल्लर पार्टी’ पाहण्यासाठी ३००० विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर: राजर्षी शाहू स्मारक मध्ये २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी चिल्लर पार्टी चित्रपट पाहण्यासाठी ५८ शाळेतील ३००० विद्यार्थ्यांनी या चित्रपटाचा लाभ घेतला.

यावेळी बी.एम. हिरडेकर म्हणाले, “सिनेमा पाहून आपण जेव्हा आपल्या मित्राला कथा सांगतो तेव्हा आपण त्यामध्ये रमून जातो,आपले भाषेचे ज्ञान समृद्ध होते.”

महोत्सवाच्या ठिकाणी उभारलेल्या २५ फुटी होडीसमोर फोटो काढून घेण्यासाठी मुलांनी गर्दी केली होती. यावेळी शाळेतील शिक्षकांचे स्वागत प्रवीण चौगले यांच्या हस्ते करण्यात आले .अभय बकरे यांनी प्रास्ताविक केले. तसेच आभार घनश्याम शिंदे यांनी मानले.

यावेळी मिलिंद नाईक, विजय शिंदे, सुधाकर सावंत, पद्मश्री दवे, गुलाबराव देशमुख उपस्थित होते.

🤙 8080365706