
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग व महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर्स असोशियनच्या मान्यतेने कोल्हापूरमध्ये F360 पश्चिम महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत आयोजक आकाश कवडे यांनी दिली.

एकूण १लाख ६६ हजारांची बक्षिसे असणाऱ्या या स्पर्धेत कोल्हापूर ,सांगली, सातारा ,सोलापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शरीरसौष्ठवपटू सहभागी होणार आहेत.
२७ फेब्रुवारीला गांधी मैदानावर सायंकाळी चार वाजता ही स्पर्धा होणार आहे असेही त्यांनी सांगितले. ही स्पर्धा सात गटात होणार असून यामध्ये ५५ किलो गट ५५ ते ६०, ६०-६५,६५-७०,७०-७५,७५-८०आणि ८० किलो वरील समावेश आहे. प्रत्येक गटासाठी रुपये ३०००/,२०००/,१०००/,५००/,५०० अशी पाच बक्षिसे आहेत .मेन्स फिजिक यातील विजेत्याला रुपये १००००/,७०००/,५०००/,३०००/,१०००/अशी पाच बक्षिसे आहेत. मास्टर्स हडीकँप गटासाठी रुपये ५००० /,४०००/,३०००/,२०००/,१००० मोस्ट इम्प्रुव आणि बेस्ट म्युझिक पोझर गटांचा सुद्धा यामध्ये समावेश असणार आहे. यातील विजेत्याला रुपये ५०००/अशी पारितोषिके आहेत. प्रतिष्ठेच्या Mr. F360 २०२३ला रोख ५१००० हजार रुपये बक्षीस आहे. स्थानिक शरीरसोष्ठवपट्टूंना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू असल्याचे आकाश कवडे यांनी सांगितले . यावेळी आकाश कवडे ,उदय कवडे ,इम्तियाज शेख ,स्वप्नील उलपे, यशवंत पाटील, गौरव कदम, विजय मोरे आदि उपस्थित होते.
