
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णयआमच्या बाजूनं आल्यामुळं उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय, त्यामुळं ते घाबरले आहेत, बिथरले आहेत. त्यामुळं आमच्यावर आरोप करत आहेत. आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले.
