
राजगड : हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजांचा गड, गडांचा राजा किल्ले राजगड हा पुण्यातील वेल्हा तालुक्यात आहे. तालुक्याला वेल्हा नाव असल्यामुळे राजगड 90% लोकांना माहित नाही. राजधानीच माहित नाही तर इतिहास काय समजणार. त्यासाठी वेल्ल्याचा राजगड तालुका करण्यात यावा, अशी मागणी शिवराष्ट्र परिवारचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून केली.
यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी राजगड महत्व विशद केले. यावर मुख्यमंत्री महोदय यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देऊन लवकरात लवकर वेल्ह्याचे राजगड असे नामकरण करण्यासाठी तातडीने पावले उचलू असे ठोस आश्वासन दिले.
