
तुर्की : तुर्की आणि सीरीया पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तुर्की आणि सीरीया देशाच्या सीमेवर आणखी एक भूकंप झाला आहे.

हा भूकंप 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याची माहिती समोर आली आहे. तुर्कीच्या हाते प्रांतात भूकंपाचे धक्के बसले. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी आहेत. भूकंप झालेल्या ठिकाणी मदतकार्य सुरू असून मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.दोन लाख घरांचे काम तातडीने सुरू करणारअनादोलु एजेन्सीने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या हाते प्रांतात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाला असून 213 जण जखमी झाले आहे. राष्ट्रपती रेसेप तईप एर्दोगन यांनी सोमवारी हाते प्रांताचा दौरा केला. सरकार पुढील महिन्यात भूकंपग्रस्त भागात जवळपास दोन लाख घरांचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
