राज्यात भाजप -शिवसेना एकत्र निवडणूक लढणार

कोल्हापूर : काँग्रेस सत्तेत असताना अराजकता माजली होती. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सत्ता आल्यानंतर देशाचा विकास झाला महाराष्ट्रात आत्ताचे भाजप शिवसेनेचे सरकार आल्यानंतर विकास झाला असून राज्य प्रगतीत गेले आहे. येणाऱ्या निवडणुकीतही भाजपची सत्ता येणार आहे राज्यात भाजप व सेना एकत्रच लढणार असल्याची घोषणा शहा यांनी कोल्हापूर येथील भाषणात केली. आज अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.

यावेळी भाजपच्या वतीने संकल्प मेळावा आयोजित केला होता यावेळी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न त्यांनी भाषणातून केला काँग्रेसच्या काळात बारा लाख कोटीचे घोटाळे झाले.उलट भाजप सरकारच्या काळात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. घराघरात गॅसची व्यवस्था ंसाठी शेतकऱ्यांसाठी मदत आलेल्या साखर कारखान्यांना दहा हजार कोटीची मदत देऊन भाजप सरकारने लोकांची मने जिंकली आहेत. भाजप हा जन्मला अपेक्षित असणारे काम करणारा पक्ष आहे यासाठी भाजपला सत्तेत आणण्याचा निर्धार करा असे आवाहन केले मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार धनंजय महाडिक यांची भाषणे झालीत तर समजीतसिंह घाटगे, आम .विनय कोरे, प्रकाश आबीटकर, संजय काका पाटील आदी उपस्थित होते.

🤙 8080365706