डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये पारंपरिक जल्लोषात शिवजयंती साजरी

तळसंदे: पारंपारिक उत्साहात शिवजयंती साजरी करताना विद्यार्थी

तळसंदे : डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे व डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्यावतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्त गेल्या दोन दिवसपासून कॅम्पसमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिवजयंती निमित्त दोन दिवस गडकोट संवर्धनावर आधारित रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रात्री मशाल महोत्सव, भवानीचा जागर, असे कार्यक्रम झाले. रविवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी कुलभूषण कोळी, अधिराज पाटील व इतर विद्यार्थ्यांनी यांनी पहाटे पन्हाळगडावरून शिवज्योत आणली. त्यानंतर सकाळी श्रींचे विधिवत पूजन केले. डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ के प्रथापन यांच्या प्रमुख उपस्थितीत पारंपरिक वेशात, भगव्या उत्साहात पालखी सोहळा साजरा करत विद्यार्थ्यांनी वातावरण शिवमय करून टाकले. संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांनी शनिवारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

शिवाजी महाराजांची युद्धनीती, राजकारभार व व्यवस्थापन कौशल्य हे आजही सर्वांसाठी आदर्श आहे. महाराजांच्या जीवनकार्यातुन प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.

कॅम्पस डायरेक्टर डॉ पावसकर म्हणाले शिक्षणाबरोबरच आपल्या संस्कृतीची ओळख होण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कॅम्पस मध्ये थोर पुरुषांची जयंती साजरी केली जाते. सामाजिक कार्यासह, टेक्नॉलॉजि ग्रामीण भागात रुजवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो

राजवर्धन पाटील व साईराज पवार, सुरज निकम, पवन पाटील, चोथे यांनी उत्तम नियोजन केले . सूत्रसंचालन आदिती पाटील हिने केले. प्रा उमेश पाटील, एन एस एस चे प्रा केदार रेडकर, श्री विनोद उतळे, श्री देवेंद्र भोसले यांच्यासह विद्यापठाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, रजिस्ट्रार प्रकाश भागाजे, डीन अकॅडेमिक्स प्रा आर. एस. पोवार यांचे प्रोत्साहन लाभले..

🤙 8080365706