
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह व पक्षाचे नाव मिळाले नंतर ते प्रथमच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूरात आले होते.या वेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानी त्यांचे जोरदार स्वागत केले.

या वेळी माजी आमदार चंद्रदिप नरकेंची उपस्थिती प्रामुख्याने होती.तसेच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व खास धैर्यशील माने, चंद्रदीप नरके हे स्वागतासाठी आघाडीवर होते त्यांनी धनुष्यबाण असलेली प्रतिकृती मुख्यमंत्री शिंदे यांना दिली.त्यामुळे नरके यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश निश्चित झाला असल्याचे मानले जाते. नरके यांनी नुकताच कुंभी साखर कारखान्याच्या निवडणू कीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पॅनेलचा पराभव केला आहे.
