
मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येत आहे.

राज्यभरात शिवजयंती निमित्ताने मिरवणुका निघणार आहेत. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला नमन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल झाले आहेत. तर उत्तर प्रदेशातील आग्र्यातही पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्र्यात उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
