
मुंबई : मुंबईत पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एका परीक्षार्थीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

चालक पदाच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत 17 फेब्रुवारी रोजी कलिना इथल्या कोळे कल्याण मैदानात उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येत होती. त्याचवेळी या भरतीसाठी आलेल्या 26 वर्षीय गणेश उत्तम उगले हा उमेदवार 1600 मीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण होण्यापूर्वीच चक्कर येऊन जमिनीवर पडला. गणेशला तात्काळ व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
