शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांना टोल माफी

शिवनेरी : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शिवभक्तांनी टोलमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे.१९ फेब्रुवारीला शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना टोल माफ करण्यात आला आहे.

शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी करण्यात आली आहे.यामध्ये खालापूर, तळेगाव, खेड, राजगुरुनगर टोलनाक्यावर टोलमाफी असेल सरकारकडून घोषित करण्यात आलं आहे. शिवनेरी किल्ल्यावर यावर्षी सरकारकडून शिवजंयती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलंय. त्यामुळेच शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याची शक्यता असल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे. यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसंस्कृती आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पर्यटन विभागामार्फत राज्यातील महत्वाच्या उपक्रमांचे पर्यटन वेळापत्रक बनविले असून त्याच उपक्रमांतर्गत यंदापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

🤙 8080365706