राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परीक्षांवर बहिष्कार…

मुंबई : २० फेब्रुवारीपासून राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठीय व महाविद्यालयीन परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे.

१५ फेब्रुवारीपासून हे आंदोलन अधिकच पेटले असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लंच टाइममध्ये निदर्शने केली. १५ फेब्रुवारीला काळ्या फिती लावून काम केले, तर १६ फेब्रुवारीला एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. बुधवारी उपमुख्यमंत्र्यांसोबत राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या बैठकीत विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊनही सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नसल्याने शिक्षकेतर कर्मचाऱयांनी यापुढे बारावी परीक्षा काळातही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पुकारलेला एक दिवसाचा लाक्षणिक संप 100 टक्के यशस्वी झाला.

मुंबई विद्यापीठासह एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईसह राज्यातील इतर जिह्यांतील विद्यापीठे व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप केला. कर्मचाऱ्यांनी हजेरी पत्रकात स्वाक्षरी न करता विद्यापीठ, महाविद्यालयाच्या गेटपाशीच आंदोलन केले. राज्य सरकारकडून मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन मिळत नसल्याने येत्या सोमवारपासून बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षकेतर कर्मचाऱयांनी घेतला आहे.

🤙 8080365706