
कोल्हापूर : कळंबा ते साई मंदिर येथून क्रांतिसिंह नाना पाटील नगर ते फुलेवाडी नाका रिंगरोड रस्त्याची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात निदर्शने करण्यात आली होती. याची दखल घेत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व उपअभियंता एन. एस. पाटील यांनी रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येईल असे आज झालेल्या बैठकीत सांगितले.
क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौकातील गणेश मंदिराच्या बागेच्या परिसरामध्ये झालेल्या बैठकीत रस्त्याची दुरुस्ती तसेच पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग या कामासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी या बैठकीत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपाभियंता एन. एस. पाटील, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष निवास नलावडे, उपाध्यक्ष गजानन विभूते, सदाशिव पुंडे, चंद्रकांत बागडी आदि उपस्थित होते.
