शिक्षक भरतीमध्ये क्रीडा विभागाला प्राधान्य किती..?

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यात लवकरच तीस हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. गेल्या वीस वर्षांत शासनाने राज्यात शिक्षक भरती झालेलीच नाही, आता त्यामुळे या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे. पण आता या नियोजित शिक्षक भरतीमध्ये क्रीडा विभागात किती टक्के शिक्षकांची भरती होणार आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

सध्या क्रीडा शिक्षकांची राज्यात प्रमाण कमी आहे. विद्यार्थ्यांना खेळाची गोडी लागावी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी अनेक मोठ-मोठ्या शैक्षणिक संस्थेत क्रीडा शिक्षकच नसल्याचं पाहायला मिळतंय. जिथे विद्यार्थ्यांना खेळाडू म्हणून घडवले जाते त्याच ठिकाणी क्रीडा शिक्षणच मिळत नाही, त्यामुळे खेळाडू घडीवणार कोण ? आणि त्यांच्या भवितव्याचा ही सवाल उपस्थित होतो आहे.एकीकडे क्रीडा स्पर्धा भरविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कोटयावधी रुपये खर्च करत आहे. मात्र खेळाडू तयार करण्यासाठी ज्या क्रीडा शिक्षकांची गरज असते, त्यांचीच नेमणूक होत नसेल तर हा कोटयावधी रुपयांचा खर्च व्यर्थ जातोय अशी खंत व्यक्त केली जात आहे. म्हणून निजोजित शिक्षक भरतीत क्रीडा शिक्षकांची किती टक्के भरती होणार आहे. असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी समितीच्यावतीने शिक्षण उपसंचालकांना निवेदनाद्वारे विचारण्यात आला.यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, दीपक गौड, प्रकाश आमते उपस्थित होते

🤙 8080365706