मुंबईकर नागरिक आणि शिवसेना यांच्यातील अतुट नाते गद्दारांनी बुद्धीभेद केला तरी तुटणार नाही; संजय राऊत

नाशिक : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत मुंबईला चकरा मारत आहेत.मात्र त्यांनी कितीही जोर लावला तरी मुंबईवरील भगवा कोणीही उतरवू शकत नाही. मुंबईकर नागरिक आणि शिवसेना यांच्यातील अतुट नाते गद्दारांनी बुद्धीभेद केला तरी तुटणार नाही, असा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल यांच्या अभीष्टचिंतन सोहळा खासदार राऊत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. आगामी 2024 मध्ये नाशिकसह महाराष्ट्रात भगवा पडकवू असे राऊत म्हणाले.

🤙 8080365706