महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी आज संपली…

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आज संपली आहे.आज पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

मागील सुनावनीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वकिलांनी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी केली होती. त्यावर आज ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदंत कामत यांनी युक्तीवाद केला.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकिल कपील सिब्बल युक्तीवाद केला. यावेळी कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निर्णयावरच बोट ठेवले आहे. ते म्हणाले, न्यायालयाचा २४ जूनचा आदेश वादग्रस्त आहे, या आदेशामुळे सरकार पडले आहे. त्यानंतर १२ जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलली गेल्याने आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय होऊ शकला नाही, अशा युक्तीवाद त्यांनी केला आहे.तसेच वेगवेगळ्या निर्णयांचे दाखले सिब्बल यांनी दिले. सिब्बल यांनी या आधी जो युक्तीवाद केला होता. तो असा आहे की ”एका प्रकरणामुळे, तुम्ही अपात्रतेपासून वाचू शकत नाही. अध्यक्षांवर फक्त एका नोटीशीनुसार आपण अविश्वास ठराव आणू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. दहाव्या सूचीनुसार विधानसभा अध्यक्षांना आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार आहे. अधिवेशन सुरू असताना अध्यक्षांना हटवण्याची नोटीस दिली जाते. अशाने कुणीही सरकार पाडू शकेल, असे सिब्बल म्हणाले.

🤙 8080365706