सुळकुड पाणी योजना रद्द होईपर्यंत लढण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

कागल : इचलकरंजी शहारासाठी प्रस्तावित असलेल्या सुळकुड पाणी पुरवठा योजनेला सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून ही योजना रद्द होईपर्यंत आपण सर्व शेतक-यांच्यावतीने लढा उभारणार आहोत. १७ फेब्रुवारी रोजी सुळकूड बंधार्यावर होणार्या पाणी परिषदेला वेदगंगा काठावरील शेतकऱ्यांसह नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे यांनी केले आहे.

कालव्याला सोडण्यात येणारे पाणी अनेकदा कागल तालुक्यातील शेवटच्या टप्प्यात असणार्या गावांना मिळतच नाही. लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नसताना इचलकरंजी साठी पाणी देण्याचा शासन हट्टाहास का धरत आहे.असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. बारामतीमध्ये कालव्यांना कायमस्वरुपी पाणी मिळते.

माञ, येथे १५ते२० दिवसांनीही पाणी मिळणे कठीण झाले आहे.त्यामुळे भविष्यात ही योजना झाली तर पाणी कपातीची टांगती तलवार येथील शेतकऱ्यांवर आहे.त्यामुळे ही योजना कोणत्याही परिस्थितीत होवू देणार नाही.असा निर्धारही त्यांनी व्यक्त. यावेळी धनराज घाटगे, सरपंच काकासाहेब सावडकर आदी उपस्थित होते.

🤙 8080365706