डी वाय पाटील अभियांत्रिकीतर्फे समता हायस्कुलमध्ये जलशुद्धीकरण कार्यशाळा

कसबा बावडा: जलशुद्धीकरण व संवर्धन कार्यशाळाच्या उद्घाटनप्रसंगी विजय ओतारी, डॉ. के. टी. जाधव, डॉ. अमरसिंह जाधव, सावंत, सुजित देसाई, के एस जाधव, ओंकार पाटील आदी.

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल विभागातर्फे कदमवाडी येथील समता हायस्कूलमध्ये ‘जलशुद्धीकरण, जलसंवर्धन तसेच दैनंदिन जीवनातील पाण्याचे महत्व’ यावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी डी वाय पाटील महाविद्यालयाच्या केमिकल विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव यांनी जल संवर्धन व बचत तसेच दैनंदिन जीवनातील पाण्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आपल्या घरी व समाजातील जवळपासच्या घटकाकरिता जलबचत व संवर्धन कसे करता येईल हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. अधिष्ठाता ( संशोधन) डॉ. अमरसिंह जाधव यांनी जलशुद्धीकरण तसेच पाण्यामधील उपयोगी व घातक घटक, तसेच ते तपासणी करण्याकरता असणाऱ्या टेस्ट याबाबत मार्गदर्शन केले. के एस जाधव, ओंकार पाटील व अमर जाधव यांनी पाण्यासंदर्भातील महत्वपूर्ण टेस्ट विद्यार्थ्यांच्या समोर प्रात्यक्षिकसह करून दाखवल्या. या कार्यशाळेत 8 वी ते 10 वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक सावंत, सुजित देसाई तसेच जिल्हा विस्तार अधिकारी विजय ओतारी यांचे सहकार्य लाभले. डी. वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष कुमार चेडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

🤙 8080365706