आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेषः

रोजगारात ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. आत्मविश्वासात अनिश्चितता राहील. कामात झालेल्या बदलांमुळे ताण वाढण्याची शक्यता आहे. व्यापार व्यवसायात उतविळपणामुळे नुकसान होईल.

वृषभ:

नोकरीत हितशत्रु वरचढ पणा करण्याची शक्यता आहे. व्यापारिक जबाबदारी देणे घेणे सीमीत ठेवा. आर्थिक स्थिती मध्यम राहील. अनिष्ट स्वरूपाचे दिनमान राहील. थकित रक्कम मिळण्यास विलंब होईल. कामकाजात प्रगतीचे योग जुळून येण्यास अडचण जाणवेल.

मिथुन:

मतभेद व वादांना टाळण्याचा प्रयत्न करा. मित्रमैत्रिणींकडून, आप्तेष्ट नातेवाईकांकडून आज विशेष सहकार्य लाभणार आहे. आपल्या पराक्रमी वृत्तीमुळे आपल्याकडे येणाऱ्या लोकांच्या अपेक्षा जास्त राहतील. कोणाचाही तिरस्कार करू नका. व्यापार व्यवसाय चांगला राहील.

कर्क:

शांत राहण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवा. धावपळ व धगधग वाटेल. संयम कमी होऊ शकतो. मनोबल संभाळा. नातेवाईकांसोबत कलहाचं वातावरण निर्माण होण्याचे प्रसंग उद्‌भवतील. शैक्षणिक कामात अडथळे निर्माण होतील.

सिंह:

नोकरीत धाडसी व घडाडीचे निर्णय घ्याल. यश मिळेल. राजकीय सामाजिक कार्याबद्दल उत्तम दिनमान आहे. पतप्रतिष्ठा वाढेल. आपले प्रयत्न यशस्वी होतील. विचारपूर्वक निर्णय घेतल्याने व्यापार-व्यवसायात नफ्यात वाढ होऊन अनपेक्षित लाभ होईल.

कन्या:

नोकरीत नवीन संधी मिळतील. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ व विस्तार होईल. नोकरीत स्थान बदलाची उत्तम संधी आहे. बढ़ती व प्रमोशनचे योग आहेत.आजचा दिवस सफलतापूर्वक व्यतीत कराल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य लाभेल. व्यापारात नविन योजनाची सुरुवात होऊ शकते.

तूळ :

वाणीवर संयम राखा. कामाच्या ठिकाणी गैरसमज वाढतील. उत्पनातून मन समाधानी राहणार नाही. सुखचैनीच्या वस्तूत खर्च वाढेल. व्यावसायिकांनी मोठे व्यवहार टाळावेत. खरेदीविक्रीचे व्यवहार करू नये. काही मनस्तापासारख्या घटना घडतील. ताणतणाव जाणवेल.

वृश्चिक:

जामीन राहू नका.कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. काहीसा अडचणीत आणणार दिनमान राहील. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती उदभवेल. व्यापारात बदलाचे मोठे निर्णय घेऊ नयेत. मित्रमैत्रिणींबरोबर व्यवहार करताना जपून करा.

धनु:

केंद्र स्थानातील गुरूमुळे आध्यात्मिक, देवी सुखशांती अनुभवाल.तिर्थक्षेत्री यात्रा कराल. नोकरी-व्यापारात प्रगतीकारक योग आहे. आपले निर्णय अचूक ठरतील. कौटुंबिक जीवनात आनंदी रहाल. मनाला शांती लाभेल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल.

मकर:

भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. शासकीय कर्मचारी असाल तर महत्वाचे निर्णय आज घ्याल. व्यवसायात मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. मित्र नातेवाईक यांच्याकडून मदत मिळेल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

कुंभ:

दिवस शुभ सकारात्मतेत वाढ करणारा आहे. आत्मविश्वास द्विगुणित राहील. शुभसंदेश ऐकायला मिळतील. नोकरीतील बदल लाभदायक ठरणार आहे. नवीन नोकरीत मुलाखतीत यश येईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मीन:

प्रकृती स्वास्थ अस्थिर राहण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांकडून त्रास जाणवेल. कामात अतितणाव निर्माण होईल. व्यापारात जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत. कौटुंबिक जीवनात चिंताग्रस्त वातावरण राहिल. आर्थिक खर्चाच्या बाजुत वाढ होईल. 

🤙 8080365706