पन्हाळ्यातील साधोबा ऊरुस बुधवार पासुन..!ऊरुसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पन्हाळ्यातील हजरत पीर शहादुद्दीन खतालवली अर्थात साधोबा दर्गा.

पन्हाळा: राष्ट्रीय एकात्मतेचे एक जाज्वल्य प्रतिक असलेल्या पन्हाळगडावरील हजरत पीर शहादुद्दीन खतालशाह वली अर्थात साधोबाचा ऊरुस उत्सव बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे.

ऊरुसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले असल्याची माहिती दर्गा ट्रस्टी मँनेजर अब्दुल सत्तार मुजावर यांनी दिली.ऊरुसाची जय्यत तयारी सुरु असुन पन्हाळा येथे भाविक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.कोरोनामहामारी मुळे मागील तीन वर्षापासुन साधोबा ऊरुस औपाचरिक पद्धतीने साजरा करण्यात आले होते.पण आता कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने यावर्षी ऊरुसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसुन येत आहे.बुधवारी दि.15 रोजी सकाळी 9 वाजल्यापासुन हजरत पीर माँसाहेब यांच्या ओटी भरणीचा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी हिंदु-मुस्लीम महिलांच्याकडुन ओटी भरणीसाठी मोठी गर्दी होते.16 फेब्रुवारी हा ऊरुसाचा मुख्य दिवश.या दिवशी पहाटे 2:30 वाजल्यापासुन हजरत पीर शहादुद्दीन वली यांच्या रोजा मुबारकला मुजावर(खादिम) मंडळी कडुन गंधलेपण होणार असुन यानंतर 4:30 वाजता भाविकांच्या उपस्थितीत गलेफ विधी होणार आहे.ऊरुसासाठी महाराष्ट्र व कर्नाटक भागातील भाविक दाखल होत असुन पन्हाळा येथे खेळण्याची,फुलांची,ऊद-नारळांची दुकाने थाटु लागली आहेत.16 फेब्रुवारीला रात्री 10 वाजता मशहुर कव्वाल शिराज चिश्ती,अहमदाबाद यांचा कव्वालीचा कार्यक्रमाजे आयोजन करण्यात आले आहे.17 फेब्रुवारी रोजी पहाटे शासकीय गलेफ विधी होणार आहे.पन्हाळा येथील छ.संभाजी महाराजांच्या मंदिरातुन शाही इतमामाने तहसिलदार व अन्य शायकीय अधिकारी यांच्या तसेच मानकऱ्याच्या उपस्थितीत हा गलेफ पीर बाबांच्या रोजा मुबारकवर घातला जातो.याच दिवशी रात्री 10:00 वाजता सारेगमप फेम शर्वरी जाधव,अली हुसने पुणे,सचिन जगताप यांचा जीवनगाणे हा हिंदु गाण्यांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान यावर्षी ऊरुसाची जोरदार तयारी सुरु असुन शनिवार 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजता दर्गा ट्रस्टच्या वतीने महाप्रसाद(भंडारा) चे आयोजन केले आहे.सध्या दर्गाच्या इमारतीची रंगरंगोटी करुन विद्युत रोषणाई केली आहे.ऊरुसासाठी मानकरी गडावर दाखल होत आहेत.

🤙 8080365706