खूपिरे येथील शाहू आघाडीचे ४०० मतदार रॅलीने मतदान केंद्रावर; घोषणांमुळे काही काळ वातावरण तंग

,

दोनवडे : कुंभी कासरी साखर कारखाना निवडणुकीसाठी खुपिरे मतदान केंद्रावरदुपारी अकरा वाजता ५० टक्के मतदान झाले .शाहू आघाडीच्या वतीने रॅली काढून सुमारे ४०० ते ५०० मतदार एकत्रित मतदान केंद्रावर आले.

तर नरके पॅनेलच्या वतीनेही मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते. राजश्री शाहू आघाडीचे उमेदवार आनंदा कृष्णा पाटील व सर्जेराव जोती पाटील तर तर नरके पॅनलचे उमेदवार संजय बळवंत पाटील व विश्वास पाटील (कोगेकर) हे मतदान केंद्रावर उपस्थित होते दोघांच्याही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करून शक्तिप्रदर्शन केले. शाहू आघाडीच्या महिला उमेदवार स्नेहल पाटील व त्यांचे पती उत्तम पाटील हे मतदान केंद्रावर आले त्यांनी शाहू पॅनेलच्या विजयाच्या घोषणा दिल्या यानंतर नरके पॅनेलच्या वतीनेही विजयाच्या घोषणा देण्यात आल्या त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पण दोन्ही कडील प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले त्यानंतर वातावरण निवळले. दोन्ही पॅनल कडूनही मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहनांचा वापर करण्यात येत होता कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते.

🤙 8080365706