
बहिरेश्वर : बहिरेश्वर ता. करवीर येथील भोगावती व कुंभी नदी संगमाजवळ तब्बल पाच महिन्यांनंतर आज पून्हा मगरीचे दर्शन झाले.

त्यामुळे नदीवर अंघोळीला जाणारा तरूण वर्ग तसेच धुणे धुवायला जाणा-या महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत विभागाकडून सर्वाना सतर्क राहण्याच्या सूचना सरपंच युवराज दिंडे यांनी दिल्या आहेत.प्रशासनाने मगरीला पकडून सुरक्षित स्थळी सोडावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.
