
आपण केसांना लावतो. पण तेल लावताना योग्य ती काळजी घेतल्यास केस दिर्घकाळ चांगले राहण्यास मदत होते. म्हणूनच तेल लावताना कोणत्या चुका करू नयेत याबाबत माहिती घ्यायला हवी.

. जास्त तेल लावणेखूप जास्त तेल लावल्याने केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांना आवश्यक तेवढे तेल लावणे गरेजेचे आहे, मात्र प्रमाणापेक्षा जास्त लावू नये.
मुळांना मसाज न करणेकेसांच्या मुळाशी तेल लावताना डोक्याला तेलाने मसाज करणे आवश्यक असते. मात्र अनेकदा आपण घाईत मुळांना मसाज करत नाही. पण केसांच्या मुळांशी मसाज केल्यास डोक्यातील ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. त्यामुळे तेलाचा पूर्ण फायदा मिळावा असे वाटत असेल तर किमान काही वेळ केसांना अवश्य मसाज करायला हवा.
केसांचे तेल नीट न धुणे अनेकदा आपण तेल लावतो आणि पूर्ण दिवस-रात्र किंवा २ दिवस तसेच ठेवतो. तेल जास्त वेळ ठेवल्यास केस चांगले राहतील असा आपला समज असतो. मात्र असे करणे केसांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. तसेच घाईघाईत केस धुतल्यास तेल नीट निघत नाही. त्यामुळेही केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते.चुकीचे तेल वापरणेआपल्या केसांचा पोत, त्यांना असलेली तेलाची आणि इतर पोषक घटकांची आवश्यकता यांचा योग्य तो विचार करुन तेलाची निवड करायला हवी. विविध तेलांमध्ये वेगवेगळे घटक असतात, हे घटक आपल्याला सूट होणारे नसतील तर त्याचा उपाय होण्याऐवजी अपाय होऊ शकतो.
तेल गरम केल्याने त्याच्या पोषणात काही प्रमाणात वाढ होते. त्यामुळे तेल नुसते लावण्यापेक्षा कधीही गरम करुन लावायला हवे. त्यामुळे केसांचे चांगले पोषण होण्यासाठी तेल गरम करुन मगच लावायला हवे. आपण केसांना लावतो. पण तेल लावताना योग्य ती काळजी घेतल्यास केस दिर्घकाळ चांगले राहण्यास मदत होते. म्हणूनच तेल लावताना कोणत्या चुका करू नयेत याबाबत माहिती घ्यायला हवी.
