
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेत रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

रविकांत तुपकर वेशांतर करून स्वाभिमानीच्या या आंदोलनात सहभागी झाले होते. आत्मदहनाच्या या प्रयत्ननंतर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतलंय. कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसह पीकविमा अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. काल रात्री 15 हजार शेतकऱ्याच्या खात्यावर 10 कोटी पिकविम्याचे जमा केल्यानंतरही रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम आहेत. या आंदोलनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
