
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे ( गोकुळ) म्हैस व गाय दूध आज, शनिवारपासून प्रतिलिटर दोन रुपयांनी महागले आहे.

मुंबई व पुण्यात म्हैस दुधासाठी प्रतिलिटर ७२ तर कोल्हापुरात ६६ रुपये मोजावे लागणार आहेत. गाय दुधाचे दर अनुक्रमे ५६ व ५० रुपये राहणार आहेत. विक्रीबरोबरच खरेदी दरातही वाढ केली जाणार असून दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.संपूर्ण देशात दुधाची टंचाई भासू लागल्याने गेल्या वर्षभरात दुधाच्या दरात प्रतिलिटर दहा रुपयांची वाढ झाली आहे. दुधाची मागणी व पुरवठा यामध्ये तफावत वाढत असल्याने सगळीकडेच दुधाची टंचाई भासत आहे. त्यात तोंडावर उन्हाळा सुरू असल्याने उत्पादनात थोडी घट होऊन मागणी वाढणार आहे.
