
पन्हाळा : वाघवे ता.पन्हाळा येथील विजय रामचंद्र गुरुव वय-५५ वर्षे यांने गळफास लावुन घेतल्याने आत्महत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
या घटनेची नोंद पन्हाळा पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, विजय गुरव यांनी आपल्या राहते घरातील पाठीमागील बाजुस बाथरुम शेजारी पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अगँलला नायलाँन दोरीने गळफास लावुन घेतले. यामध्येच ते मयत झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. ही घटना आज शुक्रवारी सकाळी 6:00 वाजता उघडकीस आली.
दरम्यान, विजय गुरुव यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजु शकले नसल्याने तर्क-वितर्क लावले जात आहे.याबाबत युवराज अशोक पाटील वय:४० रा.वाघवे यांनी पन्हाळा पोलिसांत वर्दी दिली असुन अधिक तपास पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डोईजड करत आहेत.पन्हाळा ग्रामीण रुग्णालायात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
