
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत आज पाच जणांनी ती घेतली असली, तरी २८ उमेदवार रिंगणात राहिले आहे. त्यामुळे २६ तारखेला होणाऱ्या मतदानासाठी या मतदारसंघात दोन ईव्हीएम मशिन लागणार आहेत.मात्र, लढत ही तिरंगीच होणार आहे.

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर (३ जानेवारी) १५ दिवसांतच (१८ जानेवारी) जाहीर झालेल्या या मतदारसंघाच्या पोटनिवडणुसाठी ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यातील ३३ जणच पात्र ठरले. त्यातील पाच जणांनी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आज माघार घेतली. त्यामुळे ३३ जण रिंगणात राहिले आहेत. त्यात बहूतांश अपक्षच आहेत.
