शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभावर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकण्याचे आवाहन….

कोल्हापूर : व्यक्ती युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान राखू शकत नाही, त्यांच्या हस्ते आपण पदवी घेणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या विद्यापीठाचा आणि छत्रपतींचा अवमान आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभावर विद्यार्थ्यांनी बहिष्कार घालावा, असे आवाहन युवासेनेकडून करण्यात आले.

युवासैनिकांनी आज विद्यापीठाबाहेर निदर्शने करून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. यावेळी ‘कोश्यारी यांचा दौरा रद्द करा’, ‘कोश्यारी चले जाव’च्या घोषणा देत युवासैनिकांनी विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला.येत्या 16 फेब्रुवारी रोजी होणाऱया शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने अवमानकारक वक्तव्य करून महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्यांनाच छत्रपतींच्या नावाने असलेल्या विद्यापीठात प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आल्याने शिवसेना, युवासेनेकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. राज्यपालांना कोल्हापुरात येऊ देऊ नका, यासाठीकुलगुरूंना निवेदन देऊन ‘जेल भरो आंदोलना’चा इशारा देण्यात आला आहे. आज युवासेनेकडून राज्यपालांविरोधात सह्यांची तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधनाची मोहीम राबविण्यात आली.

🤙 8080365706