
अंगणवाडी ताई खंबीर, सरकार मात्र गंभीर
साळवण प्रतिनिधी: एकनाथ शिंदे
गगनबावडा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गगनबावडा एसटी स्टँड जवळ चक्काजाम आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. (आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्ची खाली करा ) अशा विविध मागण्यांनी परिसर दणाणून सोडला. तसेच पंचायत समिती गगनबावडा कार्यालयाच्या पटांगणामध्ये आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी सर्व सेविका व मदतनीस यांनी महिला बालकल्याण सीडीपीओ सुमन जाधव यांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर सुपरवायझर पूजा खाडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी गगनबावडा अंगणवाडी सेविका प्रमुख प्रियांका पाटील, वर्षा पांगळे, नंदा कांबळे, भारती कोळेकर, बाळाबाई शिंदे, उमा सप्रे, पुनम वरेकर, रेश्मा कांबळे तसेच गगनबावडा तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
