
साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे
म. ह. शिंदे महाविद्यालय तिसंगी यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबीराचे उद्घाटन धुदंवडे येथे पार पडले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आठ दिवस चालणाऱ्या शिबीराची रुपरेषा प्रास्ताविकातून ए.डी. पिंजरकर यांनी सांगितले.

शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी सौ. माधुरी परीट उपस्थित होत्या. तसेच अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एस. पडवळ हजर होते. श्रम संस्कार शिबीराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते व धुंदवडे गावचे सरपंच एम. जी. पाटील यांच्या हस्ते झाले.
ग्रामीण भागातील युवकांनी तसेच युवतींनी विशेष श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक बांधिलकी जपावी. तसेच देशाला महासत्ता बनवण्याची जबाबदारी आजच्या युवक आणि युवतीवर आहे.तेच देशाचे भवितव्य आहेत. असे प्रतिपादन गगनबावड्याच्या गटविकास अधिकारी सौ. माधुरी परीट यांनी व्यक्त केले.
यावेळी ए. बी.पाटील, एम. जी. पाटील, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य पडवळ सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवक स्वयंसेविका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोद कांबळे यांनी तर आभार डी. एस. पवार यांनी मानले .
