
कोल्हापूर : हमालीचे दर वाढवून द्यावे म्हणून कोल्हापूर बाजार समिती मधील चारशे हमाल संपावर गेले होते. गेले बरेच दिवस वाटाघाटी होऊनही संप मिटला नव्हता. दरम्यान कामगार आयुक्तांनी व्यापारी व शेतकरी यांच्या काही प्रतिनिधी बरोबर चर्चा केली होती पण त्यांनीही वाढीव हमाली देण्यास नकार दिला होता. जिल्हाअधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी हस्तक्षेप करत नवीन पन्नास कामगार कामावर घेऊन गुळ सौदे सुरू केले होते. दरम्यान बुधवारी कामगार आयुक्त पोळ कोल्हापुरात दाखल झाले होते.

त्यांनी व कामगार उपआयुक्त यांनी वेळोवेळी या हमाल संघटनेबरोबर चर्चा केली बऱ्याच चर्चेनंतर रात्री हमालांनी कामावर जाण्याचे मान्य केले होते. हमाल रुजू झाल्याने मार्केट यार्ड मधील गुळाचे सौदे काढण्याचे काम पूर्ववत झाले आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी दिली.
