
कोल्हापूर :” माझी बदनामी करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. माझ्याविरोधातील एकही आरोप खरा ठरला तर मी आमदारकीचा राजीनामा देईन,” असं रोखठोक मत ट्विटव्दारे व्हिडिओ शेअर करत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं.
शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बदनाम करण्याचं पाप करू नका, असंही ते म्हणाले.
आज मुश्रीफांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, आरोप सिद्ध झाले तर मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. 40 हजार शेतकऱ्यांच्या नावावर 10 हजारप्रमाणं घेतलेले शेअर ते कारखान्याच्या उभारण्यासाठी खर्च केले असतील तर ठेव ठेवण्याची काय गरज होती. शासनाकडून एक पैशाचही अनुदान खासगी कारखान्याला मिळत नाही. याची सुद्धा सोमय्यांना माहिती नसावी. त्याचंच मला आश्चर्य वाटतंय.
