
बहिरेश्वर: करवीर तालुक्यातील आदर्श शाळा म्हणुन नामांकन असलेल्या विद्या मंदिर पासार्डे शाळेत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पाडले. सकाळपासूनच बालचमुंनी अगदी नटुन थटुन उपस्थिती लावली होती.

गावचे लोकनियुक्त सरपंच विष्णु पाटील यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तद्नंतर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बदाम पाटील यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सूरवात केली. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना करुन उपस्थित पालकांची मने जिंकलीत.यावेळी पालकांनीही आपल्या पाल्याचे कौतुक म्हणून हजारो रुपयांची बक्षिसे दिली.
विद्यार्थ्यांनी प्लास्टीक बंदी, प्रदुषण आदी विषयांवर नाटकातून उपस्थित ग्रामस्थांचे प्रबोधन केले. लोकनाट्य, लावणी, लहान चमुन्नी आपल्या आदाकारीनी उपस्थित मान्यवर, पालक, ग्रामस्थ यांची मने जिंकली. सुमारे सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत भर उन्हातही पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या सुत्रसंचालन राजु अत्तार सर, विद्या कांबळे यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक स्टाफ, गावातील प्रतिष्ठित नागरिक,सर्व पालक वर्ग शाळेचे आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
