
कसबे: दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर कसबे दवंडा या गावामध्ये एका व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

कसबे दवंडा या गावांमध्ये एका व्यक्तीने आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला केला आहे. ही माहिती प्रज्ञा सातव यांनी स्वतः फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करून दिली आहे. या प्रकरणामध्ये आखाडा बाळापूर पोलिसांनी काल रात्री उशिरा हल्लाखोराला ताब्यात घेतले आहे.
कसबे दवंडा या गावांमध्ये एका व्यक्तीने आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला केला. ही माहिती प्रज्ञा सातव यांनी स्वतः फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करून दिली. या प्रकरणामध्ये आखाडा बाळापूर पोलिसांनी तत्काळ हल्लाखोराला ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा या हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्याची माहिती देताना प्रज्ञा सातव म्हणाल्या की, “संध्याकाळी 8 वाजता कसबे दवंडा या गावात असताना एक अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीजवळ आला. नियोजित कार्यक्रमाच्या स्थळी असताना, मी भाषण देत असताना एक व्यक्ती मागून आला, मला त्यानं ओढलं आणि हल्ला केला. समोर असलेल्या लोकांनी या व्यक्तीला पकडले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले.
