
पुणे: ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ मधील कर्मचाऱ्यांनी ९ आणि १० फेब्रुवारीला संपाचा इशारा दिला आहे.

बँक कर्मचाऱ्यांनी बँकेच्या व्यवस्थापनाविरुद्ध २७ जानेवारीलाही संप केला होता. पण तरीही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने, दखल घेण्यात न आल्याने आता पुन्हा संप पुकारण्यात आला आहे. यामुळे बँक बंद राहण्याची शक्यता आहे. चतुर्थ श्रेणीतील भरती बंद करुन आऊटसोर्स केले जाणार असल्याची भूमिका बँकेच्या व्यवस्थापनाने घेतल्याने बँकेच्या कामकाजातील गोपनियता, ग्राहकांच्या ठेवी व त्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, म्हणून आम्ही नाराज असल्याचे कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे.
