मांडुकलीत नरके.पँनेलची विराट सभा: सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती….

साळवन प्रतिनिधी : एकनाथ शिंदे

मांडूकली येथील कुंभीकासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुडित्रे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२३ ते २०२८ या निवडणुक प्रचार विराट सभा संपन्न झाली .

यावेळी माजी आमदार व कुंभीकासारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके व गोकुळचे संचालक अजित नरके तसेच डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत खानविलकर, सहदेव कांबळे, सदस्य बयाजी शेळके, सहकार समूहाचे संस्थापक माननीय विलास पाटील, गगनबावडा तालुका अध्यक्ष संदीप पाटील, माजी सभापती बंकट थोडगे व मांडूकली गावचे सरपंच राजाराम पाटील आणि डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे सर्व संचालक व उमेदवार हजर होते .

विराट सभेस संबोधित करत असताना आमदार चंद्रदीप नरके यांनी गगनबावड्याची जनता सुज्ञ आहे. डी. सी. नरके व संस्था सदस्य म्हणून आपले गगनबावड्याची आपुलकीचे नाते आहे.

गगनबावडा येथील जनतेने प्रत्येक वेळी आपल्याला साथ दिलेली आहे अशीच साथ व विश्वास दाखवून अंगठी या चिन्हा समोरील बटन दाबून नरके पॅनेल ला प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले .

तसेच आमदार बंटी पाटील यांनी आपल्याला सहकार्य करण्याचे ठरवले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार प्रकट केले .

🤙 9921334545