
गारगोटी : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचातीमधील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा शुक्रवार दि.3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.00 वाजता आबिटकर कॉम्प्लेक्स, गारगोटी येथे खासदार संजय मंडलिक यांच्या शुभहस्ते व आमदार प्रकाश आबिटकर आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

यावेळी बोलताना आबिटकर म्हणाले की, गावाचा विकास घडवून आणण्यासाठी सरपंचाची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे त्यांना प्रोत्साहन व शासनाकडून मिळणार्याप विविध योजनेच्या माहिती देणेसाठी भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचातीमधील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा शुक्रवार दि.3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.00 वाजता आबिटकर कॉम्पेक्स, गारगोटी येथे खासदार संजय मंडलिक यांच्या शुभहस्ते व आमदार प्रकाश आबिटकर आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार असून तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.यावेळी बाजीराव चव्हाण, तालुकाप्रमुख संग्राम सावंत, युवासेना तालुका प्रमुख विद्याधर परीट, माजी उपसरपंच अरुण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मोरे, रणधिर शिंदे, सुशांत सुर्यवंशी, अजित चौगले, महेश सुतार, दशरथ राऊत, प्रशांत भोई यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.
